अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन
मुंबई, दि.१: आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपट सृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री व शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना शिवबंधन बांधले. या प्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित होते. उर्मिला यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक कॉंग्रेसतर्फे लढवली होती ज्यात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर त्या कोंग्रेस मधील राजकारणाला वैतागून विजनवासात गेल्या होत्या. विधानपरिषदेच्या १२ जागांमध्ये शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. थोड्याच वेळात सायंकाळी चार वाजता त्या पत्रकार परिषदेत आपले विचार व्यक्त करणार आहेत.
