उरणमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन
उरण, दि.१९(विठ्ठल ममताबादे): कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उरण महाविद्यालय, लायन्स क्लब उरण, मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्था उरण, माजी विद्यार्थी संघ, टायगर ग्रुप उरण, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने एम जे एफ लायन सदानंद सखाराम गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दि २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, तहसील कार्यालयासमोर उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करून या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी विशाल पाटेकर – 9920484545,
प्राध्यापक डॉ. दत्ता हिंगमिरे – 9922100391, विठ्ठल ममताबादे – 9702751098 यांच्याशी संपर्क साधावे.
