उरण तालुका ‘लेदर क्रिकेट असोसिएशन’ ने आयोजित केली होती स्पर्धा
उरण, दि.२९ (विठ्ठल ममताबादे): उरण मधील भेंडखळ गावाच्या भव्य मैदानावर चालू झालेली टी-२० लेदर क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे आयोजन जेएनपीटी च्या हिरव्यागार मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत मेगा फायनल मध्ये जय मल्हार संघाचा स्कोर ११२/१०(१८.५० ओव्हर) सहज (१४.५ ओव्हर) मध्ये डीपी लायन्स संघाने पूर्ण करून विजय मिळविला. फायनल मॅच चा मॅन ऑफ दी मॅच किताब प्रमोद पाटील यांना मिळाला. या स्पर्धेचा मॅन ऑफ दी सिरीज प्रथमेश म्हात्रे, तर बेस्ट बॉलर वैभव पाटील, बेस्ट फिल्डर विवेक ठाकूर, मोस्ट सिक्स भूषण म्हात्रे, बेस्ट बॅट्समन, मोस्ट फिफ्टी, मोस्ट 38 फोर असे तीन किताब संदीप पाटील (पपू) यांना मिळाले. फेअर प्ले अवॉर्ड एमजी मराठा टीम ला मिळाला.

या स्पर्धेला माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल महानगर पालिका विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, रायगड व उरण ४०+ चे अध्यक्ष अण्णा गावडे आणि विजय पाटील, उरण टेनिस अध्यक्ष महेश कडू, संतोष शेठ घरत सरपंच जासई, मंगेश भाई चौगले, जगजीवन भोईर, किरीट भाई पाटील, जितेंद्र ठाकूर, बी. एन. डाकी, विनोदभाई म्हात्रे, धनाजी शेठ ठाकूर, जितू भाई नाईंक, सदानंद ठाकूर तसेच इतर अनेक मान्यवर यांनी भेट दिली. UPL अध्यक्ष शरद ठाकूर यांनी बक्षीस समारंभ कार्यक्रमात दोन्ही टीम चे अभिनंदन करून सन्मानित केले. तर पुढील २०२२ च्या स्पधेसाठी तयार असल्याचे सुतोवाच करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. या वेळी स्पर्धा पार पडण्यासाठी आर्थिक, तसेच बक्षीस स्वरूपात दिलेल्या देणगीदारांचे, मैदान उपलब्ध करून देणाऱ्या भेंडखळ ग्रामपंचायतीचे, जेएनपीटी स्पोर्ट क्लब चे, स्पर्धेतील सर्व टीम मालकांचे, कॅप्टन आणि खेळाडू, तालुका क्रिकेट पंच कमिटी, स्कोर राईटर, समालोचक व प्रेक्षक यांचे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण लेदर क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी अजित म्हात्रे उपाध्यक्ष, मंदार लवेकर उपाध्यक्ष, मनोज भगत कार्याध्यक्ष, अमित पाटील खजिनदार शरद म्हात्रे, विकास घरत, संदीप पाटील पपू, दिनेश बंडा, संदीप तांडेल,अमित ठाकूर, भूषण म्हात्रे, रोशन पाटील, तसेच भेंडखळ क्रिकेट युवक यांनी सहकार्य केले.
