Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसैनिकांकडून उरण परिसरातील तलावात गणेशोत्सवपूर्व स्वछता मोहीम

शिवसैनिकांकडून उरण परिसरातील तलावात गणेशोत्सवपूर्व स्वछता मोहीम

उरण, दि.२६(विठ्ठल ममताबादे): शिवसेना शाखा नवघर यांच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर व परिसरातील नागरिकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या आसरा देवीच्या तलावात वाड-वडीलांपासून श्री गणपती विसर्जन केले जात आहे. त्या तलावाची तसेच तलावाच्या बांधावरील झालेल्या गवताची, तलावात झालेली शेवाळ, तलावात भाविकांनी सोडलेले निर्माल्य बाहेर काढून शिवसैनिकांतर्फे सदर तलावाची गौरी-गणपती विसर्जनासाठी साफसफाई करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय राजाराम भोईर, ग्रामपंचायत सदस्य गणेश रमाकांत वाजेकर, शिवसेना शाखा प्रमुख अविनाश एकनाथ म्हात्रे, माजी उपसरपंच रविंद्र भोईर, विद्यमान उपसरपंच हितेश भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक के. डी. भोईर, ज्ञानेश्वर तांडेल, माजी शाखाप्रमुख विश्वनाथ भोईर, शिवसैनिक विकास भोईर, उपशाखाप्रमुख विशाल डाके, शिवसैनिक सुनील भोईर, निलेश पाटील, कुमार सौरभ, घरत कुमार, शुभम पाटील व नवघर गावातील सर्व शिवसैनिक व युवा शिवसैनिक हजर होते. इतरवेळी तलावात होणाऱ्या जलप्रदूषणाचा परिसरातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *