काँग्रेस पक्षाच्या उरण तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ उत्साहात साजरा
उरण, दि.७(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या कार्यकारिणीचा अधिकृतरित्या पदग्रहण व सत्कार समारंभ उरण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित करण्यात आला होता. रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्ह्यातील मान्यवर, नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अस्ट्रो मॅरेज हॉल, खोपटे, धसाखोशी पाड्याजवळ, खोपटे-उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले की, आपण सर्वांनी पदाचे महत्व ओळखून रात्रंदिवस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. गोरगरिबांना न्याय द्यावा. पक्षाचा प्रसार व प्रचार करावा. सर्वांनी मेहनत घेतल्यास रायगड जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष येत्या काळात एक नंबरचा पक्ष होईल असे महेंद्र घरत यांनी सांगितले. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी अहोरात्र मेहनत करून कॉंग्रेस पक्ष वाढवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण शहर अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा पदग्रहण सोहळा यावेळी संपन्न झाला. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या डिजिटल मेंबरशीप अभियाना अंतर्गत सदस्य नोंदणी बाबत प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, रायगड जिल्हा जेष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, उपाध्यक्ष किरीट पाटील, जिल्हा सरचिटणीस नित्यानंद म्हात्रे, सरचिटणीस महेंद्र ठाकूर, सरचिटणीस जीवन गावंड, अखलाक शिलोत्री, तालुकाध्यक्ष रेखा घरत, उपाध्यक्ष निर्मला पाटील, वैभव पाटील, विवेक म्हात्रे, कृष्णा पाटील, श्यामकांत पाटील, समीर म्हात्रे, सुजीत म्हात्रे आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.
