Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्याचे आयोजन

उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्याचे आयोजन

उरण, दि. २१ (विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी काही दिवसापूर्वी एक पुरातन काळातील तोफ सापडली होती. सर्व शिवप्रेमींनी, विविध संस्था संघटनांनी अथक मेहनत घेऊन ही तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर चढवली. या तोफेचे संवर्धन व्हावे, संरक्षण व्हावे या दृष्टीकोनातून रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता किल्ले द्रोणागिरीवर माजी आमदार मनोहर भोईर यांच्या शुभहस्ते तोफगाडा दुर्गापण सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल : सकाळी ९.३० वाजता मान्यवरांचे आगमन, ९.३० ते ९.४५ अभिषेक सोहळा, ९.४५ ते १०.०० ध्वज पूजन, गड पूजन, शस्त्र पूजन, १०.०० ते १०.१० तोफगाडा दुर्गार्पण, १०.००ते १०.२५ मान्यवरांचा सन्मान, १०.२५ ते १०.५० शिवशाहीर वैभव घरत यांचा पोवाडा, १०.५० ते ११.२५ मान्यवरांचे मार्गदर्शन, ११.२५ ते ११.३० आभार प्रदर्शन, दुपारी १२.०० ते २.३० भोजन. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी समस्त शिवप्रेमींनी या द्रोणागिरी गडावरील तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (उरण विभाग) व शिवराज युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *