उरण येथील कोमणादेवी ऑक्सिजन पार्क मधील दगड झाले बोलके
उरण, दि. १९(विठ्ठल ममताबादे): सारडे विकास मंच या संस्थेच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कोमणादेवी ऑक्सिजन पार्क, सारडे-उरण मध्ये मोस्ट कार्ट कंपनीचे मालक सतीश गावंड यांच्या सहकार्याने येथील निर्जीव पाषाणांवर अनेक प्राणी, पक्षी विविध प्रकारचे निसर्ग संवर्धनाचे संदेश देऊन या दगडांना सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र साटम आणि त्यांचे सहकारी स्वाती मॅडम, गणेश, ओमकार यांच्या कलाकारीने हे दगड आज जिवंत झाले आहेत. मोस्ट कार्टचे मालक सतीश गावंड यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल अनेक निसर्ग प्रेमी आणि पक्षी-प्राणी प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्व हे पहाण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. अनेक शाळाच्या शैक्षणिक सहली ह्या ऑक्सिजन पार्क मध्ये येत आहेत.

भविष्यात कोमणादेवी ऑक्सिजन पार्क हे एक सुदंर पर्यटन स्थळ व्हावे यासाठी हा प्रयत्न सारडे विकास मंचच्या सदस्या मार्फत केला जात आहे. येत्या काळात कोमणादेवी ऑक्सिजन पार्क हे एक स्वप्नातील पार्क आसेल असे मत उरण पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी व्यक्त केलं आहे. या सहा दिवसाच्या काळात अनेक मान्यवरांनी, निसर्ग प्रेमींनी कोमणादेवी ऑक्सिजन पार्कला भेट दिली. यामध्ये उरण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, विरेश मोडखरकर, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर, विनायक गावंड, रोहित पाटील, त्रिजन पाटील, रामनाथ पाटील, हरीश म्हात्रे, गणेश भोईर, सागर पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, रामदास म्हात्रे, शिवकुमार म्हात्रे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन उरण प्रमुख रणीता ठाकुर, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे राकेश पाटील, लेखिका हेमाली म्हात्रे, स्नेहाताई पाटील, रुपाली म्हात्रे सानिका, रिया म्हात्रे, चेतन गावंड, चंद्रशेखर जी. भोमकर, युट्यूबर सतीश म्हात्रे या सर्वांनी भेट देऊन या कार्याचे कौतुक केले. सर्वांनी खूप मेहनत घेऊन पार्कच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम केले आहे.

