इंद्रायणी डोंगर परीसरात लागलेल्या आगीमूळे अनेक झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी, छावा प्रतिष्ठानने लावलेली झाडेही जळाली
उरण दि. ८(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील
इंद्रायणी डोंगर परीसरात लागलेल्या आगीमूळे अनेक झाडे व नव्याने वृक्षसंवर्धन करण्यात आलेली झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. त्यामध्ये छावा प्रतीष्ठान चिरनेर ने लावलेली झाडेही जळाली आहेत. तरीही ही झाडं जगविण्यासाठी या मंडळाचे सदस्य सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करत आहेत.
उरण मध्ये सातत्याने लागणारे वा लावले जाणारे वणवे थांबविण्यास कमी मनुष्यबळ असणार्या उरण वनविभागाला व येथील जनतेला येणारे अपयश वृक्षसंवर्धनास बाधा ठरत आहे. उरणमध्ये कुठे ना कुठे सातत्याने लागणारे वणवे ही चिंतेची बाब आसून उरण मधील वन संपदा कमी करण्यास हातभार लावीत आहे.

दि. ४ रोजी लागलेल्या वणव्या मध्ये छावा प्रतीष्ठानने उंच पठारावर लावलेली व गेली २ वर्ष अथक प्रयत्नांनी जगविलेली ८० च्या वर झाडे जळाली आहेत. त्याचबरोबर अगोदर जगविलेल्या २०० च्या वर कडूनिंबाची झाड व उपजत आसलेल्या १००० च्या वर झाडांना आगीची झळ बसली आहे. तरीही छावा प्रतिष्ठान, चिरनेरचे सदस्य सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आशाळभूतपणे ती झाड जगविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. आगीबाबत वर्दी येताच तातडीने त्यांनी ४०० लीटर पाणी या डोंगरावर वाहून नेऊन या झाडांना दिले. त्यामागे त्यांचा एकच उद्देश जर त्या झाडांचे मूळ जीवंत आसेल तर पालवी फुटेल.
“निराश झालो तरी हिम्मत हरलो नाही”
“चांगल्या कामात आडथळे हे ठरलेलेच आहेत. दुख: झाले आहेच. परंतू प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहीजे की निसर्ग हा पृथ्वीतलावरील सजीवांचा आत्मा आहे. प्रत्येकाने त्याचे रक्षण करणे गरजेच आहे. निराश झालो तरी हिम्मत हरलो नाही आहोत. प्रयत्न चालूच राहतील.”
सुभाष कडू— संस्थापक-अध्यक्ष, छावा प्रतिष्ठान चिरनेर
“आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करू”
“आमचे गार्ड हे लक्ष ठेवून आहेत. परंतू क्षेत्र खूप मोठे आहे व गार्डची संख्या खूप कमी असल्याने वणवे लावणारे सापडणे कठीण जात आहे. तरीही या भागातील सामाजिक संस्थाही वणवे विझवीण्यासाठी आम्हाला चांगले सहकार्य करत आहेत. तसेच वनविभागातर्फे वारंवार जनजागृतीही करत आहोत. तरीही वणवे लावणार्यांची खबर आम्हाला द्य्या. आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करू.”
शशांक कदम, विभागीय वन अधिकारी वनविभाग, उरण
