Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “द्रोणागिरी भूषण” पुरस्काराने होणार सन्मान

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “द्रोणागिरी भूषण” पुरस्काराने होणार सन्मान

उरण दि. १७(विठ्ठल ममताबादे): उरण येथील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित २० वा युवा महोत्सव ३ मार्च ते ७ मार्च २०२१ दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान उरण जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या असोसिएशन तर्फे द्रोणागिरी भूषण पुरस्कार २०२१ साठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची झाली असून त्याची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यांना मिळणार पुरस्कार

किरण मढवी(उलवे) – सामाजिक क्षेत्र,
विद्याधर पाटील(उरण) – शैक्षणिक क्षेत्र,
सुदेश पाटील (कोप्रोली) – सामाजिक क्षेत्र
गणेश मोकल (जसखार) – शैक्षणिक क्षेत्र,
दिगंबर पाटील (उलवे) – शैक्षणिक क्रीडा क्षेत्र
प्रज्ञयेश म्हात्रे (पेण) – शास्त्रज्ञ,
तुषार म्हात्रे (पिरकोन) – शैक्षणिक
देवेंद्र पाटील (पनवेल) – शैक्षणिक,
रुद्राक्षी टेमकर (उरण) – क्रीडा
संजय होळकर (मोठी जुई) – शैक्षणिक,
सायली कोळी (करंजा) – वैमानिक,
संतोष बहिरा (पनवेल) – योगा क्षेत्र
विकास कडू (उरण) – सामाजिक क्षेत्र

या पुरस्काराचे वितरण बुधवार दि ३/०३/२०२१ रोजी दुपारी ३ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, उरण शहर येथे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सोशल, फिजिकल डिस्टन्स पाळून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त सर्व उमेदवारांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *