Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरभरती प्रक्रियेत डावलल्याने क्रांती दिनी उरण येथील नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचा बेमुदत उपोषणाचा इशारा

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरभरती प्रक्रियेत डावलल्याने क्रांती दिनी उरण येथील नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचा बेमुदत उपोषणाचा इशारा

उरण दि.२९(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यात केंद्र शासनाचा ONGC प्रकल्प कार्यरत आहे. या कंपनीत परप्रांतीयांची भरती सुरु असल्याने या भरती प्रक्रियेला स्थानिक भूमीपुत्र व बेरोजगारांनी तीव्र विरोध केला होता. नागाव म्हातवली, चाणजे ग्रामपंचायत आणि प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या यादी व्यतिरिक्त इतर अन्य लोकांची भरती प्रक्रिया करू नये यासाठी नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेतर्फे गत महिन्यात दि. २८ जून रोजी ओएनजीसी उरण गेट समोर तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची व संघटनेच्या मागण्या लक्षात घेऊन संघटनेच्या मागण्या मान्य करत ONGC प्रशासनाने नागाव म्हातवली ग्रामपंचायत, चाणजे ग्रामपंचायत तसेच प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या यादीतील व्यक्तींनाच नोकरी देण्याचे कबूल केले होते. मात्र सध्या हाउसकीपिंग भरती मध्ये परप्रांतीयांची भरती होत असल्याने नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी या भरती प्रक्रियेस तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

२८ जून रोजी उरण मधील ONGC गेट समोर झालेल्या आंदोलनात ONGC कपंनी व नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटना यांच्या बैठकीत यापुढे होणाऱ्या नोकरभरती मध्ये फक्त आणि फक्त नागाव म्हातवली ग्रामपंचायत, चाणजे ग्रामपंचायत व प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून तयार असलेल्या यादीद्वारेच नोकरभरती करण्यात यावी असे ठरले असतानाही इतर बाहेरील लोकांची भरती होत असल्याने स्थानिक भूमिपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त बेरोजगारांमध्ये ONGC कंपनी प्रशासना विरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे परप्रांतीयांची भरती रद्द करण्यात यावी यासाठी नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेने कंपनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केले असून मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्ट २०२१ पासून कंपनीच्या गेटसमोरच बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेने ONGC प्रशासनाला दिला आहे.

नागाव म्हातवली, चाणजे ग्रामपंचायत आणि प्रकल्पग्रस्त बेरोजगार समितीचा विश्वासघात करून ओएनजीसी प्रशासनाद्वारे नोकरी प्रक्रिया चालू आहे. सदर परप्रांतीयांची नोकर प्रक्रिया तूर्तास थांबवावी. अन्यथा येत्या ९ ऑगस्ट २०२१ (ऑगस्ट क्रांती दिन) पासून ONGC च्या APU गेट समोरच बेमुदत उपोषण करण्यात येईल.
– वैभव कडू
अध्यक्ष – नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटना

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *