उत्तर प्रदेशातील भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांकडून उत्साहाच्या भरात ‘कोरोनाचं’ एनकाऊंटर
काल रात्री बरोबर ९ वाजता सबंध देशाने पणती, मेणबत्ती, टॉर्च लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला साथ दिली. यावेळी लोकांनी आपल्या अंगणात, इमारतीच्या छतावर तसेच बाल्कनीत दीपप्रज्वलन केलं. पण काही नमुने असेही निघाले ज्यांनी दिवाळीच साजरी केली. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे.
उत्तर प्रदेश येथील महिला भाजप नेत्या मंजू तिवारी यांचा उत्साहाच्या भारत हवेत गोळीबार#manjutiwari #coronavirus #bjp pic.twitter.com/NZK9eTNX8G
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) April 6, 2020
भाजपच्या बलरामपूर महिला जिल्हाध्यक्षा मंजू तिवारी यांनी तर उत्साहाच्या भारत आपल्याजवळील रिव्हॉल्व्हर मधून हवेत गोळीबार केला. या संदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर सध्या फिरत आहे. आज यावरून गदारोळ सुरू झाल्यावर मंजू तिवारी यांनी झाल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की संपूर्ण शहरात लोकं उत्स्फूर्तपणे दीप प्रज्वलन करत होते तर याच धुंदीत उत्साहाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली. आता भारतीय जनता पक्ष या प्रकरणानंतर काय कारवाई करतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
