युक्रेन आणि रशिया प्रश्नी आज संयुक्त राष्ट्रांची आमसभा तसंच सुरक्षा परिषदेची बैठक
युक्रेनच्या मुद्द्यावर सुरक्षा परिषदेच्या गेल्या बैठकीपासून युक्रेनमधली परिस्थिती अधिकच बिघडली असल्याबद्दल भारताने खेद व्यक्त केला. हिंसाचार तातडीनं थांबवण्यात यावा, असं आवाहन भारताने पुन्हा एकदा केलं. संवादाच्या माध्यमातूनच हा प्रश्न मार्गी लागू शकेल, अशी भूमिका भारताने मांडली. भारतीय नागरिकांच्या विशेषतः युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी चिंता व्यक्त केली. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात रात्री उशिरा होणाऱ्या आमसभेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद असतील. नागरिकांचे रक्षण, वैर समाप्त करणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठीचा सुरक्षित व्यवस्था या आशयाचा मसुदा फ्रान्स आणि मेक्सिको तयार करणार आहे. त्यावर उद्या मतदान होण्याची शक्यता आहे.
