पुढील ७ दिवस चालणार्या या शिबिरचा जास्तीत जास्त उलवेकरांनी लाभ घेण्याचे ‘आम्ही उलवेकर’ संस्थेचे आवाहन
उलवे/नवी मुंबई, दि.२० : शेतकरी कामगार पक्ष (उलवे नोड २) व सामाजिक संस्था ‘आम्ही उलवेकर’ यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे सेक्टर – १७ येथे नवीन मतदार नोंदणी/दुरूस्ती व आधार कार्ड तपशील बदल करणेसाठीच्या शिबिराचे आज दि. १९ जुलै रोजी जितेंद्र म्हात्रे (माजी सरपंच-न्हावा) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात दिल्या जाणार्या सेवांसाठी सामान्य उलवेकरांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीये.
या शिबिराबाबत माहिती देताना आम्ही उलवेकर संस्थेचे अध्यक्ष सचिन राजे येरूणकर म्हणाले की, “पुढील सात दिवस चालणार्या या मोफत शिबिराचा उलवेकरांनी लाभ घेणे गरजेचे आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदि निवडणुकांच्या काळात नव्याने उलवे विभागात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना, १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घेणे क्रमप्राप्त आहे. आधार कार्ड मधील तपशील बदल करतानाही नागरिकांना बर्याचा अडचणींचा सामना करावा लागत होता. याच सार्या पार्श्वभूमीवर आम्ही उलव्यातील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.” शिबिरासाठी ‘आम्ही उलवेकर’ महिला मंडळाच्या अध्यक्षा सरिता साळवे यांनी विशेष कष्ट घेतले आहेत. या शिबीराची तांत्रिक बाजू महा ई सेवा केंद्राचे तज्ञ व वरिष्ठ पत्रकार अतुल शिलवंत यांनी सांभाळली आहे.

या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी माई भोईर(सरपंच – गव्हाण), सचिन घरत(उपसरपंच – गव्हाण), जितेंद्र म्हात्रे(उपसरपंच – न्हावा), रोहन खंडू, निलेश पाटील, रचना सचिन येरूणकर, सरिता साळवे, पौर्णिमा जोशी, कीर्ती फाटक, निशिगंधा शेलार, शीतल माने, संदीप नलावडे, विनोद थोरात, संदीप पाटील, इरफान शेख आदि उपस्थित होते.
शिबिराचे स्थळ : शेतकरी कामगार पक्ष जंनसंपर्क कार्यालय, सेक्टर – १७, उलवे नोड


