Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आर्थिक भागीदारी करारानुसार संयुक्त अरब अमिरातला दाग-दागिन्यांची पहिली खेप आज रवाना

आर्थिक भागीदारी करारानुसार संयुक्त अरब अमिरातला दाग-दागिन्यांची पहिली खेप आज रवाना

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील आर्थिक भागीदारी करारानुसार अर्थ विभागाचे सचिव बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतून दाग-दागिन्यांची पहिली खेप आज संयुक्त अरब अमिरातला रवाना झाली. या दोन्ही देशांमध्ये सी ई पी ए अर्थात आर्थिक भागीदारी करारावर फेब्रुवारीमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

करारानुसार या खेपेवर कोणतंही आयात शुल्क लागणार नाही. भारतामधून मोठ्या प्रमाणात मौल्यवान रत्न, दागदागिने संयुक्त अरब अमिरातला निर्यात केले जातात.
सी ई पी ए करारामुळे आगामी पाच वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धिंगत होणार आहे. ही खेप आजच संयुक्त अरब अमिरातला पोहोचण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *