मोदींची कोपरखळी आणि ट्विंकल खन्ना चे ट्वीट
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. ही अराजकीय मुलाखत होती. त्यात मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारण्यात आले. मोदींना राग येतो का, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया, निवृत्तीनंतर काय करणार असे विविध प्रश्न अक्षय कुमारने विचारले. अक्षयने जेव्हा सोशल मीडियाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मोदींनी गमतीशीर पद्धतीने उत्तर दिलं. मी ट्विटरवर सक्रीय असतो आणि तुमची पत्नी ट्विंकल खन्ना यांचेही ट्विट मी वाचतो, असं ते म्हणाले. यावर आता ट्विंकल खन्नाने प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाखतीत मोदींनी घेतलेली फिरकी पाहून, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने लगेच उत्तर दिले. ‘पंतप्रधानांना फक्त माझ्याविषयी माहिती नसून ते माझे ट्विटसुद्धा वाचतात, याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून बघते,’ असं ट्विट तिने केलं.
“होय, मी सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून असतो. मला यामुळे अनेक प्रकारची माहिती मिळते. मी तुमचे ट्विट्सही पाहतो, तसेच ट्विंकल खन्नाजींचेही ट्विट्स पाहतो. त्या माझ्यावर इतका राग काढतात की, कधी कधी मला वाटतं की, माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असावी. त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो आणि त्यामुळे तुम्हाला शांतता लाभते.”
I have a rather positive way of looking at this-Not only is the Prime Minister aware that I exist but he actually reads my work 🙂 🙏 https://t.co/Pkk4tKEVHm
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) April 24, 2019
