अपीलीय अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाचा निर्णय
हळद हा शेतीमाल म्हणून ग्राह्य धरण्यात आल्यामुळे त्यावर आता जीएसटी आकारणार नसल्याचा निर्णय अपीलीय अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं दिला आहे. मात्र हळदीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी तो लागू राहणार असल्यामुळे हळद खरेदी करणारा व्यापारी ज्यावेळी हळदीची विक्री करेल, तेव्हा त्यावर जीएसटी लागू होईल. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी हळदीवर प्राथमिक प्रक्रिया करून विक्रीसाठी आणतो. त्यांच्याकडून हळद खरेदी करणाऱ्या अडत्यांना यापूर्वी पाच टक्के जीएसटी आकारला जात होता. तो बंद होणार असल्यामुळे यापुढे शेतकऱ्यांकडून जीएसटी वसूल केला जाणार नाही.
