Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तुर्भे स्टोअर येथील धाडीत २ टन ३८५ किलो प्लास्टिकचा मोठा साठा जप्त

तुर्भे स्टोअर येथील धाडीत २ टन ३८५ किलो प्लास्टिकचा मोठा साठा जप्त

नवी मुंबई, दि. ५: स्वच्छ सर्वेक्षण विषयक आढावा बैठकीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्लास्टिक पिशव्या व एकल वापरातील प्लास्टिकचा वापर रोखण्याच्या दृष्टीने असे प्लास्टिक विक्री व वापरासाठी नवी मुंबईत आणलेच जाऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले होते. या अनुषंगाने आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या एपीएमसी मार्केट परिसराकडे तुर्भे विभाग कार्यालयामार्फत अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यामध्ये तुर्भे स्टोअर येथील राज मार्केटिंग यांचे गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधित प्लास्टिक साठा असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.
या माहितीनुसार गोडाऊनवर अचानक धाड टाकत तब्बल २३८५ किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला व संबंधितांकडून पहिल्यांदा गुन्हा असल्याने ५ हजार रक्कमेची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली, आपले सहकारी कनिष्ठ अभियंता राज नागरगोजे, स्वच्छता निरीक्षक महेंद्र रोडे, सिद्धू पुजारी, योगेश पाटील व सुरक्षारक्षक कामगार यांच्यासह ही धडक कारवाई पार पाडली. सदर साठा जप्त करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी क्रशर मशीनव्दारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
किरकोळ वापरातील प्लास्टिक प्रतिबंधासाठी कार्यवाही करण्याप्रमाणेच प्लास्टिकची विक्री व वापर रोखण्यासाठी आता महानगरपालिकेने प्रतिबंधातील प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या साठ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून सर्वच विभाग कार्यालयांमार्फत धडक कारवाया सुरू करण्यात आलेल्या आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *