राज्यातल्या प्रमुख सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई: राज्यातल्या प्रमुख सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांत नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर येथील महापौर संदीप जोशी व सर्वपक्षीय नगरसेवक एका बाजूला तर तुकाराम मुंढे दुसऱ्या बाजूला असे चित्र येथे गेल्या काही महिन्यांपासून पहावयास मिळत होते. आज अखेर सनदी अधिकारी मुंढें यांची बदली झाल्यामुळे या सगळ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. दरम्यान तीनच दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे कोरोना पॉसिटीव्ह आल्यामुळे वर्क फ्रॉम होम करत होते.
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे तपशील पहा
कैलास जाधव यांची नाशिकचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारणार असून सध्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली करण्यात आली आहे.
एस. एस. पाटील हे आता सिडकोचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणार असून अविनाश दखणे यांच्यावर परिहवन आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रामस्वामी यांच्यावर मुंबईच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनची जबाबदारी राहणार असून राधाकृष्णनन बी. हे आता नागपूरचे आयुक्त असतील. नागपूरचे सध्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सचिव म्हणून मुंबईत करण्यात आली आहे.
सी.के. डांगे यांची बदली संचालक भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे इथं करण्यात आली आहे, तर लोकेश चंद्र यांची नियुक्ती जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. अंशु सिन्हा यांची बदली कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या सचिव म्हणून करण्यात आली असून दिपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक जलस्वराज्य प्रकल्प नवी मुंबईत करण्यात आली आहे. ए. बी. मिसाळ यांच्याकडे विभागीय आयुक्त कोकण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
