Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

देशभरात नव्या पर्यटन धोरणाची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून

देशभरात नव्या पर्यटन धोरणाची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहन चालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. कोणताही पर्यटन व्यावसायिक संपूर्ण भारतात पर्यटनाच्या अधिकारासाठी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन परवानगी घेता येणार आहे.

अर्ज सादर केल्याच्या ३० दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रे आणि शुल्क जमा केल्यानंतर अधिकृत परवानगी दिली जाणार आहे.

अखिल भारतीय प्रवासी वाहन अधिकार आणि परवाना नियम २०२१ या नावाने ओळखरे जाणारे नवे नियम यावर्षी १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

सर्व विद्यमान परवानगी त्यांच्या वैधतेपर्यंत चालू राहणार असून नव्या नियमांद्वारे संपूर्ण देशात पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यात संधी उपलब्ध होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *