Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाणे-वाशी-पनवेल एसी लोकलचा शुभारंभ

ठाणे-वाशी-पनवेल एसी लोकलचा शुभारंभ

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या पहिल्या ठाणे-वाशी-पनवेल वातानुकुलित लोकल सेवेचा प्रारंभ झाला. त्यावेळी श्री. अंगडी म्हणाले की, मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधेसाठी जी काही गरज असेल, ती पूर्ण करण्यात येईल. मुंबईतील रेल्वे स्थानके स्वच्छ झाल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. रेल्वेच्या सुविधांसाठी आगामी दहा वर्षात 50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हार्बर लाईन मालाडच्या पुढेपर्यंत वाढवावी – अस्लम शेख

मध्य रेल्वेची हार्बर लाईन ही गोरेगावपर्यंत सुरू आहे. ही लोकल मालाडच्या पुढेपर्यंत वाढविण्यात यावी. तसेच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात लोकल सेवेची भाडेवाढ करू नये, अशी मागणी यापूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयास केली आहे. वातानुकुलित (एसी) लोकल सेवेचे भाडे पुढील काळात वाढवू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योग, क्रीडा व युवक कल्याण, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या हस्ते रेल्वे स्थानकावरील एलईडी इंडिकेटरचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार अरविंद सावंत, खासदार मनोज कोटक, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शरद गोयल आदी उपस्थित होते.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *