Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी काशिनाथ पाटील यांची नियुक्ती

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी काशिनाथ पाटील यांची नियुक्ती

ठाणे, दि. ११: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने काशिनाथ गोटीराम पाटील यांची पक्षाच्या ‘ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष’ पदी व महेंद्र द्वारकानाथ पाटील यांची ‘ठाणे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, ठाणे जिल्हा सरचिटणीस नामदेव गायकवाड, ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा विद्याताई वेखंडे, सामाजीक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात, शहापुर तालुका अध्यक्ष विनायक पवार आणि रंजिता दुपारे, अंबरनाथ ग्रामीण तालुका उपाध्यक्ष अभिमन्यु पाटील व कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *