पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद कडून ह्या दशकातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत, तर 25 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. या भयानक स्फोटानंतर सैन्यावर अतिरेक्यांनी गोळीबारही केला.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या आत्मघातकी हल्ल्यात अतिरेक्यांनी 200 किलोहून अधिक स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ कार जवानांच्या ताफ्यावर धडकवली. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवून आणला आहे. भारतावर करण्यात आलेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. जम्मू काश्मीर सरकारचे सल्लागार के. विजय कुमार यांनी या संदर्भातली माहिती माध्यमांना दिली आहे.
आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसवर धडकवली आणि स्फोट घडऊन आणला. हल्ल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
