केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती
दूरसंचार ग्राहकांना विनाकारण फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्ती किंवा टेलिमार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले आहेत.
डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावेत यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली.
या बैठकीमध्ये बोलतांना त्यांनी डू नॉट डिस्टर्ब नोंदणीकृत ग्राहकांना एसएमएस किंवा कॉल करणाऱ्या टेलिमार्केटर किंवा संबंधित टेलिकॉम कंपन्यांना दंड आकारण्याचे आदेश मंत्री प्रसाद यांनी दिले.
डू नॉट डिस्टर्ब नोंदणीकृत ग्राहकांसाठी असलेले नियम आणि कार्यपद्धतीची पूर्तता करावी आणि कोणतेही उल्लंघन झाल्यास आर्थिक दंड आकारला जावा असे ते म्हणाले.
Source – AIR
