पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा दणका; सोलापूर जिल्ह्यातील चार पोलिस निलंबित
सोलापूर, दि.१०: सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी पोलिस हद्दीत नाकाबंदीत वाहनचालक, इतर नागरिकांना त्रास दिल्याच्या कारणावरुन चार पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काल दिली.
यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला पोलिस कर्मचारी समाविष्ट आहेत. नाकाबंदीत वाहनचालकांना पैसे मागितल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे आली होती. त्यानुसार सातपुते यांनी माहिती घेऊन दोषींवर कारवाई केली.
