राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची ७५ हजार पदं भरण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची मदत घेतली जाणार
मुंबई, दि. २१ : लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची पदं भरण्यासाठी TCS, IBPS या कंपन्यांची मदत घ्यायचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं आज घेतला. यामुळं गट ब मधली अराजपत्रित, गट क आणि गट ड मधल्या ७५ हजार पदांच्या भरतीचा मार्ग सोपा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.
यापूर्वी विविध भरती परीक्षेत झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस-आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनानं काम सोपवण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे यापूर्वीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतली तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरची सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने या संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.
Source – AIR
