केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर परताव्यापोटी ७४७२ कोटी रुपयांचे वाटप
नवी दिल्ली/मुंबई, १२: केंद्र सरकारने, सर्व राज्यांना ५९,१४० कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून १,१८,२८० कोटी रुपये आज वितरित केले असून, महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी ७,४७२ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे.
सर्व राज्यांना जून २०२३ मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता वितरित केला आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्त्वाचे प्रकल्प व योजनांसाठी संसाधने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
