“सुशांत सिंग प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्या संदर्भातल्या याचीकांवर घाईनं सुनावणी करणं योग्य नाही”
अभिनेता सुशांतसिंग राजपूत च्या आत्महत्येचा तपास केंद्र सरकारने सीबीआय कडे वर्ग केला आहे. या संदर्भात राजकारण पेटंलेलं असतानाच मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी विविध याचिका दाखल झाल्या असून. न्यायालयाने सुनावणी दरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्या संदर्भातल्या याचीकांवर घाईनं सुनावणी करणं योग्य नाही, कारण सीबीआय नं या प्रकरणी आधीच गुन्हा नोंदवला आहे. तसंच मुंबई पोलीस देखील सुशांतच्या आत्महत्त्याचा तपास करत आहेत, असं मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भातल्या एका याचीकेवर सुनावणी दरम्यान स्पष्टं केलं आहे.
