“शेतकरी अनिश्चित काळासाठी रस्ता रोखून ठेवू शकत नाहीत” – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली: शेतकऱ्यांना निषेध करण्याचा अधिकार असला तरी त्यांना रस्ते अनिश्चित काळासाठी बंद पाडता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या पीठाने सांगितलं की सामान्य जनतेला रस्ता वापरण्याचा अधिकार आहे.
कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्ली-एनसीआर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं झालेली रस्ताबंदी हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश मागणारी याचिका नॉयडात राहणाऱ्या महिलेनं दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत नोंदवलं. पुढची सुनावणी येत्या ७ डिसेंबरला होणार आहे.
