Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

निवडणूक रोखे विक्री प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची स्टेट बँक ऑफ इंडियाला चपराक

निवडणूक रोखे विक्रीची माहिती उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँक ऑफ इंडियाला निर्देश

नवी दिल्ली, दि. ११: निवडणूक रोखे विक्रीची माहिती देण्यासाठी येत्या ३० जूनपर्यंत मुदत मागणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे. निवडणूक रोखेविषयक माहिती उद्या कामकाज बंद होण्याच्या वेळेपर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी, असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं दिले आहेत. निवडणूक आयोगानं ही माहिती परवा संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयानं १५ फेब्रुवारीला, निवडणूक कर्जरोखे योजना रद्द केली.त्यावेळीच या योजनेतून दिल्या गेलेल्या देणग्यांचे तपशील १३ मार्चपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या संविधानपीठानं दिले आहेत.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *