खटले सूचीबद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची नवी प्रणाली येत्या १ सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार
नवी दिल्ली, दि. ३० : न्यायालयातले खटले सूचीबद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय नवी प्रणाली तयार करत असून, येत्या १ सप्टेंबरपासून ही प्रणाली कार्यान्वित होईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित यांनी आज सांगितलं. वकिलांना आपले खटले न्यायालयापुढं निर्देशित करता येतील का याबाबत सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी विचारणा केली होती, त्यावर सरन्यायाधीशांनी ही माहिती दिली. प्रत्येक नोंदणीकृत खटला कोणत्यातरी दिवशी सूचीबद्ध केला जाईल आणि कोणत्याही अग्रीम सूचीत समाविष्ट केला जाईल. ही प्रक्रिया दहा दिवसात होईल. त्यामुळे सुनावणीच्या तारखा कळतील, असं त्यांनी सांगितलं.
