पवार कुटुंबीयांना कमीपणा वाटेल असं पार्थ कधीच वागणार नाही – सुनेत्रा पवार
पुणे: शरद पवार, अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेल्या पार्थला लहानपणापासून घरातूनच राजकीय बाळकडू मिळाले आहे. आजोबा, वडील व कुटुंबीयांना कमीपणा वाटेल, असे पार्थ कधीही वागणार नाही, तो खासदार म्हणून चांगलेच काम करेल, असा विश्वास पार्थ पवारांच्या आई सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुच्या तोंडावर दापोडीत सुनेत्रा पवार यांनी पार्थचा प्रचार केला. दापोडीत आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारच राष्ट्रवादी पक्षातून पार्थला उमेदवारी देण्यात आलेली आहे, असंही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. त्यांनी मोदी सरकारच्या कामावर देखील टीका केली.
मावळ मतदारसंघातून पार्थला निवडून आण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबच नात्यागोत्यासह प्रचारासाठी उतरले आहे. त्यामुळे मावळवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.
