मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत सुजय विखे-पाटलांचा भाजपात प्रवेश
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी भाजपत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजय विखे-पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय यांचे भाजपमध्ये स्वागत केले. विरोधी पक्षनेत्याच्या घरातूनच झालेलं हे बंड काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अहमदनगर मधून लोकसभेच्या निवडणुकीसाठी सीट न मिळाल्याने नाराज असलेल्या सुजय विखे पाटलांनी भाजपत प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
