नगर परिषद-पंचायत कर्मचाऱ्यांचे १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन
उरण, दि.७(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी संघटनेच्या मागण्या मान्य होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी-सदस्यांनी अर्थातच शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. १ मे २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषदेचे तसचे नगर पंचायतचे अधिकारी व कर्मचारी वर्ग बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.

विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील व उरण नगर परिषद मधील अधिकारी/कर्मचारी वर्गांनी पहिल्या टप्प्यात एकत्र येत मागण्यांबाबत दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी काळ्या फिती लावून निदर्शने केली. दिनांक १९ एप्रिल २०२२ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास दुसऱ्या टप्प्यात दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी आझाद मैदान ते मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी देखील शासनाने दुर्लक्ष केल्यास दिनांक १ मे २०२२ पासून अत्यावश्यक सेवांसाहित काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत/संवर्ग कर्मचारी करतील असे महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष सुरेश पोसतांडेल, राज्य उपाध्यक्ष प्रदीप रावनकर, राज्य सरचिटनिस रामेश्वर वाघमारे, राज्य कोषाध्यक्ष अनिल पवार, राज्य कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ घुगे, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील जाधव यांनी सांगितले. उरण नगर परिषद स्थानिक संघटनेचे अध्यक्ष संतोष तेलंगे, उपाध्यक्ष मिलिंद जाधव, संतोष गुडेकर, सचिव संजय पवार, सहसचिव आकाश कवडे, खजिनदार संजय दाते, सहखजिनदार रमेश सरवदे, कार्याध्यक्ष नितीन कासारे, सह कार्याध्यक्ष नितीन कांबरे, संघटक अनिल जगधणी, झुंबर माने, महिला संघटक सुलोचना हलसे, देवयानी गोडे, मनीषा उमते, भारती करंगुटकर, रशिदा शेख, कांचन तारेकर, सल्लागार धनंजय थोरात, राजेश कदम, संजय डापसे, हरेश तेजी, जयराम पाटील, विजय पवार, धनेश कासारे, सचिन भानुसे, संतोष कांबळे, संजय परदेशी, अनिल कासारे आदी कर्मचारी या संपात, काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
