राज्य सरकार आणखी कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत? आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक
महाराष्ट्रात कडक निर्बंध लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध हाच पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक होणार आहे.
