परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर बंधनकारक नाही
मुंबई, दि.२: परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारनं नियमात बदल केला आहे. परराज्यातून राज्यात येताना आरटीपीसीआर बंधनकारक नसेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र आणि राज्य सरकारनं घातलेल्या निर्बंधांमध्ये जी तफावत होती, ती दूर करण्यात आली असल्याचं पवार यांनी सांगितलं. मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने परदेशातून तसेच परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्या प्रवाशांसंदर्भात काहीशी कठोर भूमिका घेत नवे नियम लागू केले होते. परंतू काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत एक पत्र पाठवून राज्य सरकारकडे नव्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली होती. या नंतर राज्याने अखेर या नियमांमध्ये काही बदल केले.
