एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; मिळणार ५ हजार रुपयांची दिवाळी भेट
एसटी, अर्थात राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय एसटी मंडळानं घेतला आहे. यासाठी राज्य सरकारनं ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत जारी केल्याचं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज सांगितलं. या निर्णयाचा लाभ ८७ हजारापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार असून, ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असं ते म्हणाले.
