“एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याच्या बातम्या खोट्या” – परिवहन मंत्री ऍड. अनिल परब
मुंबई: राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून चालू होती. या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी या वृतात तथ्य नसून कोणाही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या ट्विट करून त्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामूळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील. यासंबंधी मीडियामधून फिरत असलेल्या बातम्या चुकीच्या असून, कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही.”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामूळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @satejp @AUThackeray
— Anil Parab (@advanilparab) July 20, 2020
