विभागीय निकालात कोकण विभाग पुन्हा एकदा अव्वल
मुंबई/पुणे, दि. २: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत ९३ पूर्णांक ८३ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख २९ हजार ०९६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के आहे. नागपूर विभागाची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वात कमी म्हणजे ९२ पूर्णांक ०५ शतांश टक्के आहे. बारावी परीक्षेप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५ पूर्णांक ८७ शतांश टक्के असून मुलांची टक्केवारी ९२ पूर्णांक ०५ शतांश टक्के आहे.
