गतवर्षीप्रमाणे पुन्हा मुलींनी मारली बाजी
पुणे, दि.१६: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहिर करण्यात आला. राज्याचा निकाल रेकॉर्ड ब्रेक ९९.९५ टक्के लागला आहे. यात कोकण विभागाने १०० टक्के निकालानिशी अव्वल स्थान पटकावले आहे तर सर्वात कमी ९९.८४ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. अमरावती विभाग ९९.९८ टक्के तर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के आणि कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के इतका लागला आहे.
थोड्याच वेळापूर्वी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे गतवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. शिवाय राज्यात एकूण ७५८ विद्यार्थी नापास झाले असून त्यावरूनही सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स व्हायरल होत आहेत.
