राज्यातल्या सत्ता संघर्षाशी संबंधित याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची ठाकरे गटाची मागणी झाली अमान्य
नवी दिल्ली/मुंबई, दि.१७: राज्यातल्या सत्ता संघर्षाशी संबंधित याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. आज सकाळी कामकाज सुरू होताच, न्यायालयानं ही बाब स्पष्ट केली.
त्यामुळे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार असून, येत्या मंगळवारी २१ फेब्रुवारीपासून पाच न्यायमूर्तींच्या याच घटनापीठासमोरच या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, त्यांनी गुणवत्तेवर निर्णय घ्यावा. आमचं सरकार बहुमताचं आणि कायद्याने स्थापन झालेलं सरकार असल्याचं म्हटलं आहे.
Source – AIR
