श्रीलंकन लेखक स्नेहन करुणतिलका यांच्या द सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ कादंबरीला बुकर पुरस्कार जाहीर
श्रीलंकेतले लेखक स्नेहन करुणतिलका यांच्या ‘द सेव्हन मून्स ऑफ माली अल्मेडा’ या कादंबरीला यंदाचं बुकर पारितोषिक जाहीर झालं आहे. ४७ वर्षांचे करुणतिलका यांची ही दुसरी कादंबरी असून हे पारितोषिक मिळवणारे ते श्रीलंकेतले दुसरे लेखक आहेत. पन्नास हजार पौंडांचा हा पुरस्कार लंडन इथं काल प्रदान करण्यात आला. श्रीलंकेतल्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी लिहीली आहे.