स्पाईसजेट लिमिटेड आणि सेलेबिनास एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या बेकायदेशीर कृती विरुद्ध भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाकडून त्वरित कारवाई कारवाई करण्याचे लेखी आश्वासन
मुंबई, दि.१२: स्पाईसजेट लिमिटेडने १ जानेवारी २०२२ पासून कुठल्याही परवान्याशिवाय आणि कामगार कायद्यांचा भंग करून सेलेबिनास एअरपोर्ट सर्व्हिसेस या कंत्राटदाराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड हँडलिंगचे काम करण्यासाठी कंत्राटी कामगार घुसविले आणि आपल्या सुमारे ४८६ कामगारांना काम नाकारले, अशा व्यवस्थापनाच्या विरुद्ध भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाने त्वरित कारवाई करावी यासाठी स्पाईसजेट लिमिटेड मधील कामगारांनी काल शुक्रवार दि. ११ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता श्रम रक्षा भवन समोर जोरदार ऑल इंडिया स्पाईसजेट एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने कामगारनेते ऍड. जयप्रकाश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने झाली.

निदर्शकांचा संताप लक्षात घेऊन उप मुख्य श्रम आयुक्त तेज बहादूर यांनी कामगारांच्या प्रतिनिधींशी त्वरित चर्चा केली आणि येत्या आठवड्यात या व्यवस्थापनाविरुद्ध १९७०चा कंत्राटी कामगार कायदा तसेच कामगारविषयक अन्य कायद्यामधील तरतुदींसूसार त्वरित तपासणी आणि तपासणीच्या अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी स्पष्ट स्वरूपात लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतरच निदर्शनाचा कार्यक्रम समाप्त करण्यात आला. बेकादेशीरपणे काम नाकारलेल्या सुमारे ४८६ कामगारांना त्वरित कामावर घेतलेच पाहिजे, यासाठी असोसिएशन सर्व स्तरावर प्रयत्नशील आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही कामगारांना दिलासा देणारा अंतरिम निर्णय दिला असून पुढील सुनावणी २३ मार्चला होणार आहे.

यावेळी सरचिटणीस राजेश पाटील आणि अध्यक्ष सतीश बांदल यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले. ऍड. जयप्रकाश सावंत यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या दोन मोठ्या युनियन च्या वतीने ६९३ कोटींच्या हॉस्पिटल कंत्राट गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
