“बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया” – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर
नवी दिल्ली, दि. ६: बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया आहे, आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीररित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामधे सामान्यपणे स्वीकारलेलं तत्व आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. अमेरिकेने भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना ते राज्यसभेत बोलत होते. कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणं आणि बेकायदेशीर स्थलांतराला विरोध करणं हे सार्वजनिक हिताचं आहे, असंही जयशंकर म्हणाले. काही भारतीय नागरिक अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहत असल्याचं त्यांनी यावेळी कबूल केलं.
Source – AIR
