सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर अद्याप १० टक्क्यांवर
सिंधुदुर्ग, दि.१४: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सध्या चौथ्या स्तरावरील निर्बंध लागू करण्यात आले असून या निर्बंधांची मुदत आज सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
असा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ११ पूर्णांक ८९ शतांश टक्के असून, ऑक्सिजन बेड्सची टक्केवारी ५१ पूर्णाक ५९ शतांश टक्के आहे.
