सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी : जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी
सिंधुदुर्ग: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नुकसान झालेल्या सर्व ३ हजार ५२५ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी याकडे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी विमा कंपन्यांचे लक्ष वेधले आहे.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने तत्काळ विमा कंपनीला सादर करण्याची अट या योजनेत ठेवली होती. मात्र, मोबाईल अथवा नेटवर्क नसल्याने सर्वच शेतकरी याचा लाभ घेऊ शकले नाहीत. त्यामुळे तत्काळ नुकसानीची माहिती सादर केलेल्या केवळ ४०० शेतकऱ्यांनाच विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली.
