सिंधुदुर्गवासीयांनो ३ मे नंतर गावी जाण्याचा प्लॅन करत असाल तर हे अवश्य वाचा; विलगिकरणाचा कालावधी गेला २८ दिवसांवर
परदेश, परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींच्या विलगीकरण काळात १४ दिवसांपर्यंत होत असलेलं सर्वेक्षण आता २८ दिवस करण्याच्या सूचना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
हे सर्वेक्षण विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुढचे सलग १४ दिवस होणार आहे. यामुळे उन्हाळ्यात गावी जाणाऱ्या सिंधुदुर्गवासियांची ही सुट्टी वाया गेल्यात जमा आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ओरोस आणि सावंतवाडी कारागृहातल्या कैद्यांची तपासणीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली.
Credit – AIR
