‘सिमी’चे १२ सदस्य दहशतवादी म्हणून घोषित
जयपूर: स्टुडेंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया च्या बारा सदस्यांना राजस्थानच्या जयपूर जिल्हा न्यायालयाने दहशतवादी घोषित केलं असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हे सर्व बारा जण अभियांत्रिकी शिक्षण घेत होते आणि त्यांच्यावर इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचा आरोप होता. दोषी असलेल्या तेरा जणांपैकी एकाला निर्दोष सोडण्यात आले.
सिमी या संघटनेशी जोडलेले हे सदस्य दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप होता. राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकानं २८ मार्च २०१४ ला त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
