मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने साजरा केला. यावेळी शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची आभासी प्लॅटफॉर्म वर उपस्थित होती.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “शिवसेना हेच एक वादळ आहे आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे.
शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे.”
पुढे ते म्हणाले की, “अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये ही आमची संस्कृती आहे.
ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुख सुद्धा लाचार होणार नाही.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
● शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे.
● मुंबईही रक्त सांडून महाराष्ट्राने मिळवलेली आहे कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही. म्हणून
आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केला आहे.
● शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक. आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही.
● मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीवर ची माती घेऊन राम जन्मभूमी ला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीची ही कमाल आहे.
● मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला तरी मी अंतर कमी पडू देणार नाही.
# कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे.
● शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जसे की मास्क, पी.पी.ई. किट, हॅन्ड ग्लोज.
● जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो.
● वादळ येऊ चक्रीवादळ येऊ कोणतंही संकट येऊ तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही.
● अशीच साथ सर्वांनी नेहमीच शिवसेनेसोबत द्या आणि सर्वांनी आपली काळजी घ्या.
