चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या महासचिवपदी पुन्हा एकदा शी जिनपिंग यांची निवड
चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या महासचिवपदी शी जिनपिंग यांची निवड झाली आहे. जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज बिजींग इथं पक्षाचं अधिवेशन झालं त्याला पक्षाच्या विसाव्या केंद्रीय समितीचे २०३ सदस्य आणि १६८ पर्यायी सदस्य उपस्थित होते. पक्षाच्या पॉलिटब्यूरोच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणून शी जिनपिंग यांच्या व्यतिरिक्त, लि कियांग, झाओ लेजी, वांग हूनिंग, काई की, डिंग झुएझियांग आणि ली शी यांची निवड झाली आहे. शी जिनपिंग यांचं नाव केंद्रीय लष्करी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही जाहीर करण्यात आलं. तसंच लष्करी आयोगाच्या इतर सदस्यांची नावंही जाहीर करण्यात आली.
