sharad pawar - Modi
वायुदलाच्या धाडसी कामगिरीचे भाजप सरकारकडून राजकारण – शरद पवार
राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाने दाखवलेल्या धाडसी कामगिरीचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
डिसेंबर महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्ये भाजपाने गमावली. जनता आपल्याला हळूहळू नाकारणार याची कुठेतरी भाजप सरकारला खात्री वाटत होती म्हणूनच आता जवानांच्या धाडसाचं राजकारण केलं जातं आहे असंही शरद पवार म्हटले.
सत्तेचा गैरवापर करूनच सत्ता राखायची हे या सरकारचं धोरण आहे. देशाच्या जवानांच्या धाडसी कामगिरीवर मोदी सरकार या सगळ्याचं राजकारण करत आहे, दुर्दैवाची बाब ही आहे. शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला आणि आता छाती कोण फुगवून दाखवत आहे? असाही टोला शरद पवार यांनी लगावला.
